Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत दाखल, चर्चेला सुरवात

Maratha Reservation :  सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालं आहे. मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांचं या शिष्टमंडळात सहभाग पाहायला मिळतोय. सोबतच जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे देखील यावेळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी, जरांगे यांनी दिलेल्या 24 डिसेंबरच्या मुदतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी बीडमधील 125 मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये काही वेळापूर्वी सरकारचे शिष्टमंडळ दाखल झाले आहे. यावेळी जरांगे यांच्याकडून आपल्या प्रलंबित मागण्याबाबत बाजू मांडण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, महाजन यांच्याकडून सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचवेळी 24 डिसेंबरनंतर कोणतेही कठोर भूमिका घेऊ नका अशी विनंती या शिष्टमंडळाकडून केली जात असल्याची माहिती देखील मिळत आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply