Maratha Reservation : सिंदखेड राजा येथे मराठा आंदोलक आक्रमक; तहसीलदारांची खुर्ची पेटवण्याचा प्रयत्न

सिंदखेड राजाः जालन्यातल्या अंतरवली येथे शुक्रवारी मराठा आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं होतं. पोलिसांनी अमानुषपणे आंदोलकांवर लाठीहल्ला केला. त्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतोय. आज सिंदखेड राजा येथे आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज (सोमवारी) सिंदखेड राजा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आरक्षण समर्थक नागरिकांनी राजवाडा येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्याआधी रास्ता रोको करण्यात आला.

मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर मराठा आंदोलक सिद्धू गव्हाड यांनी आपले भाषण आटोपल्यानंतर हातात पेट्रोल भरलेली बाटली घेऊन तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या कार्यालयाकडे जात खुर्ची जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांना तात्काळ माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी थांबवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Maratha Reservation : अजितदादांनी सत्तेतून बाहेर पडावे; बारामतीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचीच मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे चार दिवसांपूर्वी मनोज जरंगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी जमलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेचा जाहीर निषेध राज्यभरातून करण्यात येत आहे. सिंदखेड राजा येथेही आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.

तहसीलदार सचिन जैस्वाल यांना विविध मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी दिले. यावेळी माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, शिवाजी राजे जाधव, देविदास ठाकरे, राजेंद्र आढाव,संदीप मेहेत्रे, सतीश तायडे, राजेंद्र अंभोरे,अशोक जाधव, यासीन शेख, सिद्धू गव्हाड, शिवा पुरंदरे, डॉ. रत्नाकर किंगर, डॉ.बालाजी कलकुंबे, ॲड.अतुल हाडे, ॲड.राजेंद्र ठोसरे,ज्योती जाधव,शारदा बावणे, निलेश देवरे, अभिजित जाधव, वैभव देशमुख,योगेश म्हस्के, संजय मेहेत्रे, दिलीप खरात, गौतम खरात, नितीन शेळके, शाम मेहेत्रे, तान्हाजी भोपळे, सागर मेहेत्रे, उमेश खरात, वैभव कुहिरे, म्हासजी वाघ,प्रकाश कुहीरे,बाळासाहेब शेळके यांच्यासह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply