Maratha Reservation : मराठा समाज मागास आहे का? चाचपणी करणार; राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक

Maratha Reservation : राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक आहे. मराठा समाज मागास आहे का?, याबाबत बैठकीत चाचपणी करण्यात येणार आहे. या बैठकीला अध्यक्षांसह १० सदस्य उपस्थित राहणार आहेत. बैठकीत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्यूरेटिव्ह पिटीशनला सहाय्यक ठरेल अशी कोणतीही माहिती राज्य मागासवर्ग आयोगाला मिळू शकते का?, याची चाचपणी करण्यासाठी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बैठकी बोलावण्यात आली आहे

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

मराठा आरक्षणाच्या  पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांचे शिष्टमंडळ देखील राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे.

राज्य मागासवर्ग आयोग आजच्या बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आगे. हा आयोग राज्य सरकारला काय माहिती पुरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारल २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply