Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या सभेला साताऱ्यामध्ये विरोध; महिला आंदोलकाने दिला 'हा' इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा येथील सभेला मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण यांनी विरोध केला आहे. मराठा हा समाज असून कुणबी ही जात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये केवळ ५ टक्के कुणबी नोंदी आढलेल्या आहेत, त्यामुळे इतर मराठा समाजाला जरांगेंनी कुणबी बनवण्याचा प्रयत्न करु नये, असं त्यांनी म्हटलं आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आरक्षण दौरा सुरु केला आहे. बुधवारपासून या दौऱ्याला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी त्यांचं चंगी स्वागत होत आहे. बुधवारी रात्री धाराशिवमध्ये त्यांची मोठी सभा संपन्न झाली. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने मोठे केलेले नेते आरक्षणाला विरोध करत असल्याचं नमूद केलं.

Railway News : रेल्वे स्टेशनवर करत होते अनाधिकृत व्यवसाय; फेरीवाल्यांवर मध्य रेल्वेची बंपर कारवाई !

एकीकडे राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र साताऱ्यात त्यांच्या सभेला विरोध होताना दिसून येत आहे. मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण यांनी त्यांच्या शिवतीर्थ येथे होणाऱ्या सभेला विरोध केला.

चव्हाण म्हणाल्या की, मराठा समाजाला भडकवण्याचं काम केलं जात आहे. मुळात मराठा हा कुणबी नाही. शेतकरी हे सर्व जातींमध्ये आहेत. यामुळे ९६ कुळी मराठ्यांचं अस्तित्व नष्ट होताना दिसून येत आहे आणि ओबीसीमधील जातींवर अन्याय होत आहे.

तेजस्विनी चव्हाण पुढे म्हणाल्या की, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको आहे. मराठा समाजाला कुणबी बनवण्यचा त्यांनी प्रयत्न करु नये. आरक्षणासाठी जरांगेंनी कायद्याने लढा दिला पाहिजे. बेकायदेशीरपणे ओबीसी आरक्षण घेऊ नये, ते न्यायालयात टिकणार नाही; असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

''आम्हाला कुणबी व्हायचे नाही...असं असेल तर मग ९६ कुळी मराठ्यांनी करायचं तरी काय? तुम्हाला साताऱ्यामध्ये सभा घ्यायची असेल तर घ्या मात्र शिवतीर्थावर नको.. नाहीतर मी आमरण उपोषण करेल'' असा इशारा चव्हाण यांनी दिला. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply