Maratha Reservation : अजितदादांनी सत्तेतून बाहेर पडावे; बारामतीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचीच मागणी

Maratha Reservation : बारामती - मराठा आरक्षण देण्यास सरकार असमर्थ असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाप्रसंगी अनेक वक्त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली. या आशयाच्या घोषणाही मोर्चादरम्यान दिल्या गेल्या. बाहेर पडा बाहेर पडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा..... अशा घोषणा मोर्चादरम्यान दिल्या गेल्या.

दरम्यान सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी सर्व निवडणूकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल, एकही मराठा मतदार मतदान करणार नाही व वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणूकीला उभे करु, बारामतीचा हा संदेश राज्यात जाईल, अशी भूमिका मांडली गेली.

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीमारानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. बारामतीतही सोमवारी (ता. 4) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मोर्चा निघाला व भिगवण चौकात त्याचे सभेत रुपांतर झाले.

Maratha Andolan: मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मोर्चादरम्यान अनेक आंदोलकांनी अजित पवार यांनी आरक्षण मिळत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे, अशी तीव्र भूमिका घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केली. आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच नेतेमंडळींनी मोर्चात सहभागी व्हायला हवे होते, या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी भावनाही व्यक्त केली गेली. अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरक्षणाच्या मागणीसाठी दिरंगाई होत असल्याबद्दल सरकारचा निषेध केला. आरक्षण द्यायला जमत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असाही आग्रह काहींनी केला.

दरम्यान मराठा समाजाच्या वतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नसून त्यांच्या न्याय हक्काचे आहे, कोणाचेही आरक्षण डावलून आम्ही आरक्षण मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत असल्याचे या वेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, तहसिलदार गणेश शिंदे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply