Maratha Reservation : मराठा महासंघाची दिल्लीत २५ जुलै रोजी आंदोलनाची हाक

मुंबई - अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या एकमेव मागणीसाठी २५ जुलै रोजी दिल्लीत जंतर मंतर रोडवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. कोणत्याही मार्गाने मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाने घेतली आहे. संघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी बुधवारी ता.१९ रोजी पत्रकार परिषदेत घेऊन याबाबत माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम केले. त्यांचा आदर्श पुढे घेऊन चालले पाहिजे. आम्हाला जाती -पातीच्या राजकारणात पडायचे नसून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले तरच ते टिकाऊ ठरेल पण ते देण्यास सरकार असमर्थ असेल तर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मराठा आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आता दिल्लीत आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा महासंघाने दिली आहे. यानिमित्ताने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Chiplun Rain : पुराच्या भितीने नागरिकांनी रात्र काढली जागून; अनेकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी

ओबीसी प्रवर्गाला ऑलरेडी २७ टक्के आरक्षण असून, त्यामध्ये ३६६ जाती आहेत. व त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष त्यांचा रोष ओढवून घेण्यास तयार नाही. त्यामुळे त्यातून फारसे काही साद्य होणार असे दिसत नाही. त्यामुळे ५०% च्यावर आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल.

त्यामुळे घटनेत दुरुस्ती करून किंवा कुठल्याही नियमात बसऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावेच अशी आग्रही मागणीही करण्यात आली आहे.एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची दखल न घेतल्यास या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे.

या पत्रकार परिषदेला महासंघाचे उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे, कार्यालयीन चिटणीस वीरेंद्र पवार, महामुंबई अध्यक्ष प्रशांत सावंत, मुंबई प्रदेश अध्यक्ष धोंडू जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply