Maratha Reservation : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड,

Maratha Reservation : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी मराठा आंदोलकांना एक मराठा, लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत तरुणांना ताब्यात घेतलं.  

मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सकाळी हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला. मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते हाता काठ्या घेऊन वाहनांची तोडफोड करताना दिसले. या कार्यकर्त्यांना गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची यावेळी तोडफोड केली.

Pune Crime : पिझ्झा वेळेत न आल्याने तरुण संतापला; डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग, नागरिकांमध्ये घबराट

गाड्यांच्या काचा कार्यकर्त्यांनी फोडल्या. त्याचवेळी पोलिसांनी मध्यस्थी करता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही छत्रपती संभाजीनगरचे असल्याची माहिती मिळत आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिघांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply