Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपवलं जीवन; नांदेडच्या घटनेनं राज्यभरात खळबळ

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुनील बाबुराव कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेड जिल्ह्यातही अशाच प्रकारची एक दुर्देवी घटना घडली आहे. हदगांव तालुक्यातील वडगाव येथील एका तरुणाने शनिवारी रात्री विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

शुभम सदाशिव पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी मागणी शुभमने केली आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.

Pune Accident : पुणेकरांना पुन्हा 'संतोष माने'ची आठवण, मद्यधुंद PMPML चालकाने १०- १५ वाहनांना उडवले, थरारक VIDEO

या घटनेमुळे मराठा आंदोलक संतप्त झाले असून आंदोलन आणखीच तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. फक्त तुम्ही आत्महत्या करु नका, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे.

जर पोरंच मरायला लागले तर आरक्षण द्यायचं कुणाला? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपत आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी मंत्रिमंडळात चर्चा करुन येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा मराठ्यांसोबत खेटणं तुम्हाला महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply