Maratha Reservation : मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र दौरा, जालन्यात होणार विराट सभा... जरांगे पाटील यांची घोषणा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 17 दिवस अन्नत्याग आंदोलन करून सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दंड थोपटण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले होते. तब्बल १७ दिवसानंतर सरकारच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण जरांगे पाटील यांनी घेतले. यावेळी त्यांनी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला होता. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला या मुदतीची आठवण करुन द्यावी लागेल, असे म्हणत पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.

Maharashtra Politics : शिंदे गटाचा मास्टर प्लान, ठाकरे गटाच्या ४ खासदारांना नोटीस धाडणार; कारण काय?

महाराष्ट्र दौरा...

मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी ३० सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यासह नगर, नाशिकचा दौरा करून 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.

१०० एकरात होणार सभा...

मनोज जरांगे पाटील यांची होणारी सभा तब्बल १०० एकरात होणार असून सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात ही विराट सभा पार पडणार आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या सभेला हजेरी लावणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply