Maratha Reservation : मोठी बातमी! अखेर 17व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरावाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास सदैव प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगितलं. 

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे.

मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, सरकार तसा जीआर काढत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती.

Pune Accident News: पुण्यात भरधाव रुग्णावाहिकेने ट्रकला धडक दिल्याने रुग्णवाहिकेतील १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता जालन्यात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास तत्पर असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी आरक्षणात लक्ष घातले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील, असा मला विश्वास आहे. त्यांनी येथे येऊन ते सिद्ध केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. मी उपोषण सोडलं असलं, तरी आपलं आंदोलन शांततेत सुरू राहणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

समाजाला विचारुन मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील असा मला विश्वास आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply