Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी बीडमध्ये भाजप नेत्याचा कार्यक्रम बंद पाडला, जोरदार घोषणाबाजी

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे  यांच्याकडून राज्यभराचा दौरा केला असून, दुसरीकडे याच मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना मराठा आंदोलक जाब विचारतांना दिसत आहे. बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम बंद पाडल्याची घटना समोर आली आहे. आरक्षण मिळेपर्यंत गावात एकही राजकीय कार्यक्रम होऊ न देण्याची आंदोलकांची भूमिका आहे. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी बंद पाडला असून, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. माजी आमदार भीमराव धोंडे हे गाव चलो अभियान या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा या गावात आले होते. यावेळी हा कार्यक्रम सुरू असताना मराठा आंदोलक तिथे पोहचले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठ आंदोलकांनी कार्यक्रम बंद करायला लावला. मराठा आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहता कार्यक्रम त्वरित बंद करण्यात आला.

Loksabha Election 2024 : भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार? दिग्गजांची धाकधुक वाढली

 जरांगेंच्या एसआयटी चौकशीवरून मराठा आंदोलक आक्रमक...

बीडच्या निमगाव चोभा या ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयात भीमराव धोंडे यांचा कार्यक्रम सुरू होता. हा राजकीय कार्यक्रम असल्याची माहिती मराठा आंदोलकांना मिळाल्यावर ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी कार्यक्रम बंद करायला लावला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची आदेश दिले असल्याने, मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे फडणवीसांच्या पक्षाचा एकही कार्यक्रम गावात होऊ देणार नसल्याची भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.

भाजप नेत्यांवर मराठा आंदोलकांच रोष...

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीवरून राज्यभरातील मराठा समाजात रोष पाहायला मिळत आहे. यावरून सर्वत्र तीव्र नाराजी पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका भाजप नेत्यांना बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चांगेफळ या गावात लग्न सोहळ्यासाठी आले असतांना चिखलीकर यांना मराठा आंदोलकांनी अडवत जाब विचारल्याची घटना 4 मार्च रोजी समोर आली होती. तसेच, "सामान्य गरीब जरांगे पाटील यांची कशामुळे एसआयटी चौकशी करता असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply