Maratha Reservation : जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Maratha Reservation : सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. काल (२४, फेब्रुवारी) मराठा समाजाकडून जिल्ह्या जिल्ह्यात रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आला होता. अशातच जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.

काल मराठा आरक्षणाच्या मागणसाठी मराठा बांधवांकडून जिल्ह्याजिल्ह्यात रास्तारोको करण्यात आला होता. या रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोकरदनमध्ये 70, हसनाबाद 15, बदनापूरमध्ये 100 पेक्षा अधिक, परतूरमध्ये 9 तर अंबडमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Gulabrao Patil : निवडणुकांना एक वर्ष बाकी, निवडणुका आल्या म्हणून विकास काम करत नाही; मंत्री गुलाबराव पाटलांचे विरोधकांना उत्तर

मनोज जरांगेंच्या आदेशानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. काही भागात आंदोलक आणि पोलिसांत धक्काबुक्की झाल्याचेही प्रकार बघायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शेकडो मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचे उल्लंघन आणि हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी सरकारकरच्या आदेशानुसार हे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकानी सरकारचा जाहीर निषेध केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply