Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक; आंदोलकांनी रस्त्यावर उतरत जाळले टायर

Maratha Protest :  धाराशिव जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्ध समाज आक्रमक झाला. या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिवमध्ये संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळले.
 
म्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले. यावेळी घोषणाबाजी केलील. त्यानंतर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply