Maratha Andolan : पंढरपूर शहराकडे येणा-या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत

Maratha Andolan : मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ आज (शनिवार) पंढरपूर तालुक्यातील ठिकठिकाणी मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले.

मराठा आंदाेलकांनी पंढरपूर शहराकडे येणा-या प्रमुख मार्गावर सरकारच्या विरोधात घाेषणा देत वाहतूक राेखली. पंढरपूर - पुणे मार्गावर वाखरी येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे पुणे आणि सातारा या बाजूला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

African Swine Fever : नंदूरबारमध्ये स्वाईन फ्लू, नागरिकांमध्ये भीती; शासनाकडून डुकरांची किलिंग प्रक्रीया सुरु

पंढरपूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर गोपाळपूर येथे मराठा समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर तिकडे शेगाव दुमाला व परिसरातील मराठा समाजाने पंढरपूर- सोलापूर महामार्ग रोखून धरला. याबराेबरच पंढरपूर - टेंभूर्णी या मार्गावर देखील आंदोलन करण्यात आले.

पंढरपूर शहराकडे येणा-या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. एकाच वेळी प्रमुख महामार्गावर रास्ता रोको व चक्काचाम आंदोलन केल्यामुळे प्रवाशांबरोबरच माघी यात्रेसाठी येणा-या भाविकांची गैरसोय झाली. या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply