Maratha Andolan : आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न; मराठा आमदारांची पोलिसांकडून धरपकड

Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करत सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी आमदारांकडून मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या मराठा आमदारांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी आमदार आक्रोश करताना दिसून येत होते. 

राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वपक्षीय मराठा आमदार एकत्रित आले आहेत. बुधवारी मराठा आमदारांनी मंत्रालय परिसरात आंदोलन केले.

Maratha Aarakshan : मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली, आमदार निवासाबाहेरील घटनेने पोलिसांची धावपळ

या आंदोलनात आमदार राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे सहभागी झाले होते. 

यावेळी आमदारांकडून घोषणाबाजी करत मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली. तेव्हा पोलीस आणि आमदारांमध्ये झटापट झाली.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाराष्ट्र विधानसभेने एक दिवसाचे तात्काळ आधिवेशन बोलवावं, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पुर्ण कराव्यात.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply