Maratha Andolan : परभणी जिल्ह्यात नेत्यांना गावबंदी, मराठा समाजाचा आज मूक माेर्चा

Maratha Andolan : मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सरकारकडून लावण्यात आलेल्या एसआयटीविरुद्ध (SIT) आज (बुधवार) परभणी येथे मराठा समाजाकडून मूक मोर्चा  काढला जाणार आहे. आरक्षणाचा प्रश्न अद्याप मिटला नसल्याने पुन्हा नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय मराठा समाजाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.

मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू ठेवला आहे. त्यास राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील यांच्यावर लावण्यात आलेली विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी (SIT) रद्द करावी अशी मागणी राज्यभरात जाेर धरु लागली आहे. परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांची चाैकशी केली जाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024 : भाजपा लोकसभेच्या 32 जागांवर ठाम? शिंदे - पवारांनी केली इतक्या जागेची मागणी; शाह सोडवणार जागावाटपाचा तिढा ?

दरम्यान आज परभणी येथे मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक माेर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चात असंख्य मराठा बांधव सहभागी हाेणार आहे. या माेर्चाच्या पार्श्वभूमीवर परभणी येथे पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply