Maratha Andolan : मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार; भाजप आमदारांच्या मागणीनंतर फडणवीसांची मोठी घोषणा

Maratha Andolan : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करणारे मनोज जरांगे पाटील यांचे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, भाजप आमदारांनी जरांगे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आर्थिक मदत कुणी केली? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा फडणवीसांनी विधानसभेत केली आहे. तसेच यामागचे सूत्रधार आम्ही शोधून काढू, असंही फडणवीसांनी सांगिलतं आहे. त्यामुळे जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

CM Eknath Shinde : मर्यादेपर्यंत सहन केले जाईल, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आंदोलनावरून विधानसभेत काय घडलं?

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते आशिष शेलार यांनी हा विषय सभागृहात मराठा आंदोलकांनी केलेल्या हिंसक आंदोलनाचा प्रश्न उपस्थित केला. यावरून सभागृहात प्रचंड खडाजंगी झाली. महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं शेलार म्हणाले.

महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार? असा प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात पंतप्रधानांची सभा उधळून टाकू, असं म्हटलं जातंय. हा कटकारस्थानाचा भाग आहे. या विषयाची गंभीर नोंद घेतली पाहिजे, असंही आशिष शेलार म्हणाले.

"ज्या पद्धतीची भाषा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात वापरली. यामध्ये तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी वापली. तसेच तुम्हाला शेवटची संधी देतो असं ते म्हणाले हे काय चाललं आहे? असा सवाल करत जरांगेंच्या मागून कोण बोलतंय याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे", अशी मागणी यावेळी शेलार यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply