Maratha Andolan : मराठा आरक्षण विधेयकाची लातूरमध्ये छावा संघटनेकडून हाेळी, निलंगा-किल्लारी बसवर दगडफेक

Maratha Andolan : मराठा आरक्षणाच्या  प्रश्नावरून लातूरमध्ये आज (मंगळवार) छावा संघटनेने आक्रमक हाेत आंदाेलन केले. सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावी अशी मागणी छावा संघटनेने केली. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केल्याचेही आंदाेलकांनी म्हटले. यावेळी सरकारच्या आजच्या निर्णयाची आंदाेलकांनी हाेळी करीत सरकारचा निषेध नाेंदविला.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विधिमंडळात एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एक मतानं मंजूर झालं आहे.

Water Shortage : १३ दिवसांपासून पाण्याची बोंबाबोंब; हांडे घेऊन महिलांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

 

आजच्या निर्णयाला लातूरमध्ये छावा संघटनेने विरोध केला आहे. मराठा समाजाला आज देण्यात आलेल्या अध्यादेशाची देखील यावेळी आंदोलकांनी हाेळी केली. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदाेलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

बसवर अज्ञातांची दगडफेक

निलंगा-किल्लारी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समाेर आली. निलंगा एसटी डेपोची निलंगा-किल्लारी धावणाऱ्या बसवर दगडफेक झाली. या बसच्या समोरील काच फुटली आहे. यावेळी दगडफेक करणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्याची झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध हाेत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply