Maratha Aarkshan : मराठा समाजाने धुळे- सोलापूर महामार्ग अडवला; जरांगे पाटलांची तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक

जालना : मराठा आरक्षणासाठी समाजाचा लढा सुरु आहे. दरम्यान उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची  तब्येत खालावल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून अंतरवालीतून आंदोलक आक्रमक होऊन थेट हायवेवर उतरले आहेत. मराठा समाजाच्या वतीने धुळे- सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले. 

धुळे- सोलापूर हायवेवर मराठा समाजानं चक्का जाम आंदोलन करत रास्ता रोको केला. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून पाटलांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीतून मराठा समाज आक्रमक होत थेट हायवेवरती आलं आणि रास्ता रोको केला. वडिगोद्री फाट्यावर मराठा समाजाचा चक्का जाम आंदोलन सुरु आहे. 

Maratha Reservation : नाकातून रक्त, पोटात तीव्र वेदना; मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली

आरक्षणाची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्यामुळे यावेळी दोनही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचं बघायला मिळाले. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply