Maratha Aarakshan : मराठा आंदोलन पेटलं! बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला लावली आग

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतेत सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार दोन्ही बाजुने कोंडीत सापडलंय. एका बाजुला सरकारमधील आमदार आणि खासदार आरक्षणाच्या समर्थनात राजीनामा देऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजुला राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक होत त्यांनी विविध ठिकाणी जाळपोळ केलीय. 

आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना आधी घडली. त्यानंतर राज्यातील विविध भागात जाळपोळच्या घटना घडू लागल्या आहेत. सोळंके यांचे वाहन जाळल्यानंतर मराठा आंदोलकांनी माजलगाव येथील नगरपरिषदेची इमारत जाळली. दुसरीकडे औरंगाबद जिल्ह्यातील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड तेथील काही मराठा आंदोलांनी केलीय. राज्यातील मराठा आंदोलक संतप्त झालेले असताना मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

Dharashiv Railway Station : मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये रेल रोको; रेल्वे रुळांवर झोपून आंदोलकांची घोषणाबाजी

मोटरसायकल पेटवल्या

बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर येथील दोन मोटरसायकल हे जमावांने पेटवल्या. मराठा समाज सरकारविरोधात संतप्त झालाय. समाजातील काही आंदोलकांनी ठिकठिकाणी जाळपोळ केलीय. मराठा इतका आक्रमक झालाय की, आग शमवण्यसाठी जाणाऱ्या अग्निशमन दलाचे वाहनं देखील त्यांनी पेटवून दिलेत. बीडमध्ये राष्ट्रवादी भवन, आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला आणि जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय पेटवलंय. संदीप क्षीरसागर यांचा बंगला पेटवल्याची घटना घडल्यानंतर आग शमवण्यासाठी जाणाऱ्या अग्निशमन दलाचे वाहन देखील आंदोलकांनी पेटवलं.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply