Maratha Aarakshan : सरकारला आज शेवटची विनंती, २५ ऑक्टोबरनंतर पेलवणार असं आंदोलन करु : मनोज जरांगे

Maratha Aarakshan : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सर्वांसोबत चर्चा करुन आपली भूमिका स्पष्ट केली. आता समितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करुन नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

सरकारने ३० दिवस मागितले होते, आम्ही ४० दिवस दिले. मात्र तरी आरक्षण मिळणार नसेल तर सरकारला पेलवणार असं आंदोलन करु. सर्वांसोबत सविस्तर चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरवू, असा अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

 

पुरव्यांच्या नावाखाली वेळ मागू नये

मनोज जरांगे यांनी म्हटलं की, शिंदे समिताचा अहवाल सरकारने पुढील दोन दिवसात सादर करावा. आता समितीने वेळ मागू नये आणि सरकारनेही त्यांना वेळ देऊ नये. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेत. राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुराव्यांचीही गरज नाही. पुरावे गोळा करण्याच्या नावाखाली वेळ मागू नये.

मराठ्यांकडे पुरावे आहेत तरी देखील आरक्षण नाही. मराठा समाजात रोष निर्माण होऊ नये, भावनेशी न खेळता पुढील दोन दिवसात आरक्षणाचा न्याय द्या. समितीने भरपूर काम केलं, आता समितीला काम करायला लावू नका, आता आरक्षण द्या, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका

मराठा समाज आजही शांत आहे. मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नका. सरकारला हात जोडून विनंती आहे, आता सहन करण्याची क्षमता राहिली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसात निर्णय घ्यावा. सरकारनेही वेळकाढूपणा करु नये, मराठ्यांनाही सगळं कळतंय. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

सरकारला आज शेवटची विनंती

आज सरकारला शेवटची विनंती आहे. सामान्य मराठ्याला न्याय द्या. आम्हाला आता मलमपट्टी नको, कायमचा इलाज पाहिजे. तुमच्या हातात दोन दिवस आहेत. मराठ्यांच्या नादी लागू नका, त्यांच्याशी खेळू नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply