Manoj Jarange Patil Rally: संभाजीनगरमध्ये उद्या जरांगे पाटील यांची शांतता रॅली, पोलिस भरती पुढे ढकलली; शाळा- कॉलेजला सुट्टी

Manoj Jarange Patil Rally: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची १३ जुलै रोजी म्हणजे उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महाशांतता रॅली निघणार आहे. जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या निमित्ताने प्रशासन देखील कामाला लागले आहे. जरांगे पाटील यांच्या रॅलीमुळे उद्या संभाजीनगरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची शांतता रॅली उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल होणार आहे. या रॅलीला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शहराची लाईफ लाईन असलेला जालना रोड सकाळी ९ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे. जालना रोड ८ ते ९ तास बंद राहणार आहे. तर शहरातील ५०० शाळा आणि ५० पेक्षा अधिक महाविद्यालय यासह जालना रोडवरील खासगी दुकाने आणि हॉटेल यावर याचा परिणाम होणार आहे.

Pune : धक्कादायक! पुण्यात पालिकेच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांच्या दारू पार्टी, १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे संभाजीनगर शहरातील प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शाळांना शिक्षण विभागाने एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान जालना रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय सध्या सुरू असलेली कारागृह पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची महाशांतता रॅली १३ जुलैला छत्रपती संभाजीनगरात येणार आहे. या रॅलीसाठी पोलिस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सकाळी ११ वाजता संभाजीनगरच्या सिडको येथील वसंतराव नाईक चौकातून या रॅलीला प्रारंभ होणार आहे. तर क्रांती चौक येथे या रॅलीचा समारोप होणोर आहे. जरांगे पाटील यांच्या या महाशांतता रॅलीमध्ये मोठ्यासंख्येने मराठा बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर १०० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ४००० पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply