Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम; तूर्त उपोषणावर ठाम

Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधारणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा ठराव पारित केला. त्यानंतर आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे जालन्यातीलअंतरवाली गावात गेल्या १५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी जनतेशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने एका महिन्याची मुदत मागितली असून एका महिन्यात काय निर्णय घेणार? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच सरकारला एका महिन्याचा वेळ दिला तरी, उपोषण स्थळ सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune Crime News: पुणे शहरात भरदिवसा भंगार व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण; ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्यांचा पोलिसांकडून अटक

उपोषणावर स्थळ सोडणार नाही...

सरकारला ४० वर्षे आपण दिली आहेत. सरकारने एका दिवसात जीआर काढला आहे, पण ते न्यायालयात टिकणार नाही. महिन्याचा वेळ दिला तर न्यायलयात टिकणारं आरक्षण देणार का? अशी विचारणा त्यांनी सरकारकडे केली. तसेच आरक्षणाचे पत्र हातात मिळेपर्यंत मी घरी जाणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच "आपण एकत्र असल्याने सरकार आपल्यासमोर झुकले.. असेही ते यावेळी म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply