Manoj Jarange Patil : बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली; सर्व शाळांना सुट्टी जाहीर, पोलिसांचाही तगडा बंदोबस्त

Beed : मनोज जरांगे पाटील हे उद्या गुरुवारी शांतता रॅलीनिमित्त बीड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यानिमित्त बीडमध्ये गुरुवारी शांतता रॅली आणि जनसंवाद सभेचे आयोजनही करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व शांळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे

बीडमध्ये शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत. तसेच याबाबत सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाची मोठी कारवाई; मिहीरचे वडील राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी

दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस सतर्क झाले आहेत. या रॅलीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरात २५० पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांसह एसआरपीएफचे एक प्लाटून आणि आरसीपीच्या 3 प्लाटून नियुक्त करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी याबाबतचा आढावा घेत कर्मचारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात शांतता रॅली सुरू आहे. बीडमध्ये उद्या होणाऱ्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर, बीड शहर बॅनरबाजीने सजले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे बीड नगरीत स्वागत आहे, त्याचबरोबर शांतता महारॅलीत सहभागी व्हा, अशा मजकुराचे बॅनर बीड शहरातील रस्त्या-रस्त्यावर आणि चौका- चौकात लावण्यात आले आहेत. दरम्यान उद्या होणाऱ्या शांतता रॅलीची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच पोलीस प्रशासनाने देखील या रॅलीला परवानगी दिली आहे.

लातूरमध्ये गेल्या १३ दिवसांपासून धनगर समाजाला कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलं आहे. चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर हे गेल्या 13 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply