Manoj jarange Patil : आमदारांनी मराठ्यांच्या बाजूने बोलावं अन्यथा.. विशेष अधिवेशनाआधी जरांगे पाटलांचा इशारा

Manoj jarange Patil : मराठा आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाणार आहे. उद्या मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळेल. याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"ओबीसी समाजला धक्का न लागतामराठा आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणाने ओबीस आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या जो कायदा होणार आहे त्याचं कौतुक, आनंद होणारच आहे. मात्र सरकारला सगे सोयऱ्यांबाबत भूमिका मांडावीच लागेल, फक्त अधिसुचना काढून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी करावी लागेल," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Pune Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दहा जणांवर गुन्हा दाखल; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

नेत्यांना इशारा...

"उद्या अधिवेशनात मराठा आमदारांनी आरक्षणाच्या बाजूने बोलावं. सगे सोयऱ्यांच्याबाबत एकमताने आवाज उठवावा. मंत्री महोदयांनी आणि आमदारांनी राजकारण सोडून स्पष्ट आरक्षण मागावे. मराठ्यांनी काय आमची पोरं बरबाद करण्याचा आणि तुम्हाला मोठं करण्याचा ठेका घेतलाय का?नेते जर उद्या उभे राहिले नाहीत तर ते मराठा विरोधी आहेत हे निश्चित होईल," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply