Manoj jarange Patil : 'केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी..' जरांगे पाटलांचे प्रभू श्रीरामाला साकडे

Manoj jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे सहकारी ऋषीकेश बेंद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणावरुन  सरकारवर निशाणा साधला. प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावे.. असे ते म्हणाले.

काय म्हणालेत जरांगे पाटील?

"मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचे आहे. असे आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचे मनोज जरांगे पाटील  म्हणाले.

Jalna News : शिक्षक द्या, विद्यार्थ्यांची आर्त हाक; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन

यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील  यांनी केलेल्या मराठा आरक्षणाला १ वर्ष लागू शकते या दाव्यावरुनही प्रतिक्रिया दिली. "चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल, आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे. आता पुरावे देखील सापडले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे," अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply