Manoj jarange Patil : 'मिळेल त्या वाहनाने, सर्व साहित्य घेऊन मुंबईत या...' जरांगेंचे मराठा बांधवांना आवाहन; भुजबळांवर टीका

Manoj jarange Patil : बीडच्या इशारा सभेमधून २० जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. या उपोषणात ३ कोटी मराठा बांधव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मिळेल वाहनाने, साहित्य घेऊन मुंबईकडे या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. छत्रपती संभाजनगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"महाराष्ट्रातले साखळी उपोषण स्थगित करण्यात यावे कारण मुंबईला जाण्याची तयारी करावी लागत आहे. हे आंदोलन खुप मोठं आहे त्यामुळं कोणी घरी राहू नये. मिळेल त्या वाहनाने,सर्व साहित्य एकत्र सोबत घेउन या. हे आंदोलनं आपल्याला यशस्वी करायचं आहे.कारण शेवटचं आंदोलनं असणार आहे..." असे मनोज जरांगे पाटील  म्हणालेत.

Jalgaon Accident : किर्तन आटोपुन परततांना किर्तनकाराचा मृत्यु; गॅस टँकरची दुचाकीला धडक

"उद्या ओबीसींचे आरक्षण महाराष्ट्रातील मराठ्यांना मिळणार आहे. आंदोलनाचे सर्व श्रेय मराठ्यांना मिळणार आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही..' असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तसेच 144 लागू केल्यामुळे आम्ही 20 तारीख निश्चित केल्याचेही जरांगे पाटलांनी सांगितले.

भुजबळांवर निशाणा

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा  छगन भुजबळ  यांच्यावर निशाणा साधला. भुजबळ कामातून गेलेला माणूस आहे. ओबीसींचे वाटोळे करण्याचे काम भुजबळांनी केले. असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला. तसेच गावाकडे आमचे आणि ओबीसी चे चांगले संबंध आहेत. असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply