Manoj Jarange Patil : छगन भुजबळांपाठोपाठ नारायण राणेही जरांगेंच्या रडारवर? 'त्या' टीकेला एका वाक्यातच उत्तर

Manoj Jarange Patil : कोण मनोज जरांगे पाटील, मी नाही ओळखत. त्यांनी आरक्षणाचा अभ्यास करावा. ते वयाने लहान आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला. मराठा समाज ओबीसीमधून आरक्षण घेणार नाही, असंही राणे यांनी गुरुवारी ठणकावून सांगितलं. दरम्यान, नारायण राणेंच्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. १ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत त्यांचा दौरा असणार आहे. त्याआधी जरांगेंची जालन्यात सभा होणार आहे. आज दुपारी १ वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेआधी जरांगेंनी माध्यमांसोबत संवाद साधला.

Ajit Pawar : महायुतीतल्या बारामती, सातारा, रायगड, शिरूरच्या जागा अजित पवार गट लढवणार

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आधी ओबीसी नेत्यांचा विरोध होता. आता मराठा नेतेही विरोध करीत आहे, यावर तुमची भूमिका काय? असा प्रश्न पत्रकारांनी जरांगे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना नारायण राणे यांना काहीही बोलू द्या, आम्हाला काही फरक पडत नाही, असं म्हटलं आहे.

आमचं लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकार आमचेच माणसं आमच्या अंगावर सोडत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लक्ष देणं कमी केलं आहे. परंतु त्यांची (नारायण राणे) मजबुरी असेल, त्यांना सरकार जाणून बुजून बोलायला लावत असेल, त्यामुळे ते बोलत असतील, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरची डेडलाईन दिली असून ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. आज जालन्यात जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव येण्याचा अंदाज आहे. जरांगेंचं जंगी स्वागत करण्यासाठी १५० जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यात येणार आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply