Manoj jarange-Patil : ७० वर्षात आमचं वाटोळे करणारा कोण? वाशीच्या सभेत जरांगे पाटलांचा सवाल

Manoj jarange-Patil : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून राज्यभरात दौरा सुरु केलाय. सकाळी अंतरवाली सराटीतून त्यांनी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. रात्री धाराशिवमध्ये जाहीर सभेला त्यांनी संबोधित केलं. या धाराशिवमधील वाशीमध्ये आलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं. मराठ्यांची एकजुट काय असते ती वाशी करांनी दाखवली असं म्हणत आता मराठा समाज एकत्र आलाय. सत्तर वर्षात सगळ्या पक्षातील नेत्यांना मराठ्यांनी मोठ केलं. परंतु या वर्षात आमंचं वाटोळं कोणी केलं, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

Kalyan Fire News : इमारतीच्या १० व्या मजल्यावरील घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक

आरक्षणावरून राजकीय नेत्यांवर जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. याबरोबर त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याची भूमिकाही मांडली. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणासाठी कष्ट करा, आपली कसोटी लावून धरा. जेवढी जमीन, संपत्ती महत्त्वाची आहे, तितकीच जात जीवन जगताना आरक्षण महत्त्वाची असते. आरक्षणाशिवाय आता पर्याय नाही. आपण समाजाशी गद्दारी करणार नाही, समाजाचा शब्द खाली पडू देणार नाही. पण आपल्या मतभेद होऊ देऊन नका. राजकीय लोकांच्या बोलण्यात येऊ नका. याच्या छाड्यात बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी मराठा समाज हा जागृत झालाय. आता नाही तर कधीच नाही.. अस म्हणून मराठा समाज एकञ आला सामान्य मराठा या आंदोलनात उतारलाय. आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी साखळी उपोषण सुरू करा. आंदोलन शांततेत करा,आत्महत्या करू नका, असा सल्लाही जरांगे पाटील यांनी या सभेत दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना मनोज जरांगे- पाटील यांनी राजकीय नेत्यांवर निशाण्यावर घेतलं. आरक्षणापायी आमच्या लेकरांचा घात झाला आरक्षण नसल्याने आमच्या लेकरांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी संबोधित करताना जरांगे पाटलांनी मराठा समाजातील लोकांमध्ये एल्गार भरला.

तुम्हीच खोडीचे आहात. तुम्ही नेत्यांच्या तीन-तीन पिढ्या मोठ्या केल्या. त्यांच्या पोरांना तुम्ही साहेब म्हणता. परंतु आपल्या पोरांना त्यांची काहीच मदत झाली नाही. ७० वर्षांमध्ये ज्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या आता सापडत आहेत. ७० वर्षांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं, तर जगातली सगळ्यात सुधारित आणि पुढारलेली जात मराठा जात असती. आजपर्यंत कुणी ह्या नोंदी दडवून ठेवल्या होत्या? कुणामुळे ७० वर्षे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे.

''नेत्यांची पोरं परदेशातून शिकून येतात. तो साहेबांचा भैय्या इन करतो अन् आपण त्याला बाळासाहेब म्हणतो. तेच आज मराठ्यांना विरोध करत आहेत. मराठ्यांनी ठरवलं तर त्यांना चड्डी-बनियनसकट झोडून काढतील. त्यांना आयुष्यभर मराठे गुलाल लागू देणार नाहीत.. जो आपल्या पोरांच्या मुळावर उठेल तो आपला नाही. आता फक्त आपल्याला पोरांचा फायदा बघायचा आहे. सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र यायचं आहे आणि गावागावातल्या मराठ्यांना जागरुक ठेवायचं आहे.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply