Maratha Reservation : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, लोणावळ्यात जय्यत तयारी; २०० एकर मैदान केलं जातंय सपाट

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून आज लाखो मराठा बांधवांबरोबर मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. चोवीस जानेवारीला जरांगे पाटील हे लोणावळ्यात मुक्कामी असणार आहेत. त्यासाठी दोनशे एकर मैदानावर सर्व मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांच्या राहण्याची सोय करण्यात येत आहे. 

मनोज जरांगे पाटलांच्या मुक्कामाची तयारी

लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या वाकसई गावातील दोनशे एकर मैदानावर आजपासून तयारी सुरू करण्यात येत आहे. तब्बल वीस जेसीबीच्या सहाय्याने मैदान सपाटीकरणाचं काम सुरू केलं आहे. तर सर्व मराठा बांधवांच्या जेवणाची सोय ही मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे प्रत्येक मराठा कुटुंब करणार आहे.

Sharad Mohol Case : पुणे पोलीसांचा दणका! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची त्याच्याच भागात काढली धिंड

मराठा बांधवांसाठी जेवणाची तयारी

प्रत्येक मराठा कुटुंबातून भाकरी, भाजी, शेंगदाणा चटणी, फरसाण, राजगिरा लाडू एकत्रित करून मुंबईकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना देण्यात येणार आहे. तसंच लोणावळ्यात त्यांच्या स्वागताचीही जंगी तयारी केली जातेय. त्यांचं स्वागत करण्यासाठी ५१ जेसीबी आणि २ क्रेन आहेत. यावरून जरांगे पाटलांवर फुलांची उधळण करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ते आज जालन्यातील अंतरवाली सराटी येथून हजारो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. त्यांच्या पायी यात्रेत मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यातील तणाव वाढल्याची माहिती मिळत आहे.

मराठा समाजाला आवाहन

हे आंदोलक पायी चालत २६ जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. तसंच मनोज जरांगे पाटील हे २६ जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण देखील करणार आहेत. आंदोलनाला रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला भावूक होत आवाहन केलंय. मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपली मुलं संपली पाहिजेत, असं त्यांना वाटतंय. त्यासाठीच हा घाट घातलाय. आंदोलन हे सहजरितीने घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनहीआरक्षण देत नाहीत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply