Manoj Jarange : शिक्षण, नोकऱ्यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार?; आतापर्यंतचा जरांगेंचं सर्वात मोठं वक्तव्य

Manoj Jarange : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना फक्त शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र, यावर आज मनोज जरांगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देतांना आम्हाला मिळाल्या पाहिजे असं जरांगे म्हणाले आहे. ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यासह मिळणार राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं अप्रत्यक्षपणे जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून आता ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Weather Update : ऊन पावसाचा खेळ! राज्यात पुढील 48 तास पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

काय म्हणाले जरांगे? 

मराठा आरक्षण घेताना त्यात राजकीय आरक्षण घ्यायचं की नाही या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, "आमचं जे काही हक्काचं आहे ते आम्हाला मिळणारच. मात्र, त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर करावी की, त्यांचा नेमका विरोध कशाला आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहे. आमचं हक्काचं आहे त्यामुळे आम्ही का सोडायचं. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यासाठी आमचा कोणत्या कारणासाठी विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट करावं. आमचं जे काही आहे, त्या सर्व सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजे. जे काही ओबीसींना मिळते, ते सर्व काही आम्हाला मिळालं पाहिजे, असे जरांगे म्हणाले आहे. .

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply