Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत वाढ; शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस, बीडमध्ये ९ गुन्हे दाखल

Manoj Jarange : मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण जरंगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून शिरूर पोलिसांनी देखील नोटीस बजावली आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. मध्यंतरी जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत फिरले. या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांच्यावर आतापर्यंत ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर शिरूर पोलिसांनी  गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती. परंतु ती परत आली आहे. 

Mahayuti Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३१ जागा लढवणार, सूत्रांची माहिती

सभेतील जेसीबीवर देखील कारवाईचे संकेत

दरम्यान बीड पोलिसांनी एका जेसीबी व क्रेनला देखील दंड ठेवला असून आता यापूर्वी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेमध्ये वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात असून त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply