Manoj Jarange : डिस्चार्जनंतर काही तासांतच मनोज जरांगे पाटलांची प्रकृती पुन्हा खालावली, डॉक्टरांचं पथक अंतरवालीत

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या छातीत वेदना होत आहेत. जरांगे पाटलांच्या छातीत वेदना होत असल्याने डॉक्टरांचं पथक अंतरवालीत दाखल झालं आहे. त्यांना उपचारासाठी तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

काल (१ मार्च) सकाळी मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथून उपचार पूर्ण करून अंतरवाली सराटी आंदोलनस्थळी दाखल झाले  होते. रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना वेदना होऊ लागल्याने तात्काळ त्या ठिकाणी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे.

Nagpur Crime News : अमित शहांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा; नागपुरमधील खळबळजनक घटना

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

डॉक्टरांच्या पथकांनी त्यांच्यावर उपचार करत त्यांना इंजेक्शन आणि सलाईनही दिलं. मात्र, अचानक छातीत दुखणे हे गंभीर असल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं आहे. जरांगे पाटलांना डॉक्टरांनी इंजेक्शन आणि सलाईन लावलं आहे. मात्र उपचाराला त्यांची साथ नाही.

इथे केवळ प्राथमिक उपचार केले जाऊ शकतात. त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याची गरज असल्याच डॉ. विष्णू संकुडे यांनी सांगितलं आहे. सध्या जरांगे पाटील अंतरवाली सरांटी गावात आहे. त्या ठिकाणी आराम करत आहे. मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना उपचाराची अत्यंत गरज आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे १७ दिवस उपोषण केलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

परंतु उपोषणामुळे मनोज जरांगेची प्रकृती अतिशय नाजूक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू होते, चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर काही तासांतच पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याचं समोर आलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply