Mankhurd Fire : मानखुर्दमध्ये मध्यरात्री अग्नितांडव! भंगार कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठं नुकसान

Mankhurd Fire News : मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगिवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.

अग्निशमनदलाने आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी सध्या कुलिंगच काम सुरू आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. गोदामात ज्वलनशील पदार्थ आणि इतर वस्तू होत्या, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि काही वेळात तिने भीषण रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आग एवढी भीषण होती की आगीचे आणि धुराचे लोळ दूरवर दिसत होते. अग्निशमन दलाच्या सुमारे डझन गाड्यांच्या सह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही असे वृत्त आहे. भंगार कंपाऊंडला लागलेल्या आगीमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत. 

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्हाला सकाळी ७.३० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आग विझवण्याच्या कामासाठी तैनात करण्यात आल्या. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही". 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *