Manish Sisodia : मनीष सिसोदियांना 8.30 तासांच्या चौकशीनंतर अटक! CBI नंतर आता ED ची कारवाई

Manish Sisodia News : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली आहे. ईडीने गुरुवारी तिहार जेलमध्ये सिसोदिया यांची चौकशी केली. दोन दिवसांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सिसोडिया यांना आज 8.30 तास चौकशी केल्यानंतर ईडीने अटक केली आहे. उत्पादन शुल्क पॉलिसी प्रकरणाशी संबंधित निधीच्या आरोपाखाली ईडीने त्यांना अटक केली आहे.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेवर ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. मनीषला कोणत्याही परिस्थीतत आत ठेवणे हाच त्यांच्या हेतू असून त्यासाठी दररोज नवीन बनावट प्रकरणे तयार करण्यात येत आहे असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. जनता पहात आहे, जनता उत्तर देईल', असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.

केजरीवाल ट्वीटमध्ये म्हणाले, 'मनीषला प्रथम सीबीआयने अटक केली. सीबीआयला कोणताही पुरावा सापडला नाही, लाल रंगात पैसे सापडले नाहीत. उद्या बेलवर सुनावणी आहे. उद्या मनीषला सुटले असते, परंतु आज ईढीने त्यांना अटक केली. त्यांचा फक्त एकच हेतू आहे - मनीषला कोणत्याही परिस्थीतत आत ठेवणे. दररोज नवीन बनावट प्रकरणे तयार करण्यात येत आहे. जनता पहात आहे, जनता उत्तर देईल', असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे. 
 
दरम्यान ईडीने यापूर्वी 7 मार्च रोजी मनीष सिसोदिया यांची पाच तासांची चौकशी केली होती आणि त्यांचा जबाब नोंदवला होता. दिल्ली एक्साईज पॉलिसी २०२२-२२ च्या बांधकाम व अंमलबजावणीत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना २ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply