Manish Sisodia : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया अडचणीत! १७ मार्चपर्यंत इडी कोठडीत रवानगी

Delhi News : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सीबीआयच्या अटकेविरोधात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आता २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. त्याच वेळी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे.

ईडीने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सिसोदिया यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 7 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. ईडीने आपल्या युक्तिवादात म्हटले की, मद्य धोरणाचा हा निर्णय मंत्रिगटाने सांगितला असला तरी एका व्यक्तीशिवाय इतर कोणालाही याची माहिती नव्हती ही वस्तुस्थिती अशी आहे.

कोर्टात आपला युक्तिवाद सादर करताना ईडीने सांगितले की विजय नायर हे संपूर्ण सिंडिकेटचे नेतृत्व करत होते. विजय नायर यांनाच के कविता भेटली होती. या संदर्भात ईडीने के कविता आणि विजय नायर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट सादर केला आहे. 

न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) बाजू वकील जोहेब हुसेन यांनी मांडली. आपल्या युक्तीवादात मद्य धोरण तयार करण्यामागे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचे नियम बदलून काही विशेष लोकांना 6% ऐवजी 12% लाभ देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सिसोदिया यांनी संबंधित डिजिटल पुरावेही नष्ट केले असा दावा देखील त्यांनी केला आहे. दरम्यान न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार मद्य धोरण प्रकरणात आणखी 7 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून सिसोदिया यांची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply