Manipur Violence : मैतेई अन् कुकी समाजाला थेट आवाहन; हिंसाचारावर राजनाथ सिंहांनी काढला तोडगा!

Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून अद्यापही हिंसाचार सुरुच आहे. तेंगनोपल जिल्ह्यात झालेल्या एका स्फोटात अनेक पोलीस कमांडो जखमी झाले आहेत. तत्पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

यापार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मैतेई आणि कुकी समाजाला त्यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश, काय आहे आदेश?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्या

मंगळवारी सकाळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सीमाभागातील या शहरात हिंसाचारावर नियंत्रणासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं. या कमांडोंच्या टीमच्या मार्गात स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत

कुकींचा गंभीर आरोप

दरम्यान, कुकी समाजाच्या गटानं आरोप केला की, पोलीस कमांडोंनी आधी अंदाधुंद बळाचा वापर केला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्या स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण यावर एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, इथले बंडखोर गट काहीही दावा करतात. म्हणजेच ते सांगतात ते खरंच आहे असं समजता कामा नये. उलट त्यांच्या दाव्याची पडताळणी केली पाहिजे. 

राजनाथ सिंहांनी काढला तोडगा

दरम्यान, या परिस्थितीवर तोडग्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेवटचा तोडगा म्हणून दोन्ही समाजांना थेट आवाहन केलं आहे. मैतेई आणि कुकी समाजानं एकत्र बसावं आणि थेट मनापासून एकमेकांशी संवाद साधावा आणि परस्परांमधील अविश्वासाचं वातावरण संपवावं, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply