Manipur Violence : मणिपूरमधील हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू, परिस्थिती हाताबाहेर, 13 हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले

Manipur Violance News : मागील काही दिवासंपासून मणिपूरमध्ये हिंसाचार भडकला आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवान उतरले आहेत.

मणिपूरमधील हिंसाचारामध्ये मृत झालेल्या ५४ जणांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर येथील जिल्हा रुग्णालयात आहेत तर १५ जणांचे मृतदेह जवाहरलाल इम्फाळा येथील नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे ठेवण्यात आलेले आहेत. 'पीटीआयने' यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे १० हजार जवान तैनात करण्यात आलेले आहेत. सध्या १३ हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे.

ईशान्येकडील मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची ठिणगी पडली असून सामर्थ्यशाली मेईतेई समुदाय आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला आहे.

परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले असून अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश राज्य सरकारकडून सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. या ताज्या हिंसाचारामुळे नऊ हजार लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे.

हिंसाचारग्रस्त भागामध्ये बुधवारी रात्रीच सुरक्षा दले दाखल झाली होती. त्यांना गुरुवार सकाळपर्यंत हिंसाचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात यश आल्याचे सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. अनेक ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलांकडून ध्वज संचलनाचे आयोजन करण्यात आले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply