Manchar : लव जिहाद,गोहत्या,धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी मंचर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद

मंचर : लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी (ता. २४) आयोजित केलेल्या मंचर शहर बंदला व्यावासायाकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला असून कडकडीत बंद आहे. त्यावश्यक सेवा बंद मधून वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनद्वारे टेहळणी सुरु आहे.

मंचर शहरात कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले आहे. पाटील म्हणाले, “पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सहा पोलीसउपनिरीक्षक, साठ पोलिस अंमलदार, दहा महिला अंमलदार,पन्नास होमगार्ड, आरसीपी पथक जुन्नर,व एस.आर.पी.एफ कंपनी आदी तगडा बंदोबस्त येथे आहे.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, सहय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्यासह १५ पोलीस गाड्या व दहा मोटार सायकल सतत गस्त घालत आहेत”. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारतळ, श्रीराम मंदिर, अवलिया दर्गा, छत्रपती संभाजी महाराज चौकमार्गे पोलिसांनी पथसंचलन केले. वाहनांची व बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे.

त्यासाठी काही ठिकाणी तपासणी नाके कार्यावत केले आहे.दुपारी आयोजित केलेल्या मोर्चाचे व सभेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या मार्गावार लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहनांचेही चित्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस परिस्थीतीवर लक्ष ठेवून आहे. येणाऱ्या सर्व वाहनांचे कॅमेऱ्याने सर्व मोर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे तसेच सर्व वाहनांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व नागरिकांनी शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे अपेक्षित आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply