Mallikarjun Kharge on PM Narendra Modi: 'खोटं बोला पण रेटून बोला...'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा PM मोदींवर हल्लाबोल

Mallikarjun Kharge on PM Narendra Modi : इंडिया आघाडीची महत्वाची बैठक मुंबईत सुरू आहे. २६ पक्षांची ही 'इंडिया' आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत सुरु आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. 'मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, असं ते करतात, अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ' आज बैठक झाली. ती अत्यंत चांगली झाली. या बैठकीचा उद्देश काय होता हे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. याचा प्रयत्न आम्ही बऱ्याच दिवसांपासून करत होतो. बेंगळुरूमध्ये बैठक झाली, त्याआधी पटनाला बैठक झाली. त्याआधी सगळ्यासाठी माझ्या घरी बैठक झाली. तेव्हा अनेक नेते बैठकीस होते. त्यानंतर नितीश कुमार यांच्याकडे पहिली बैठक घेण्याचं ठरवलं'.

'महागाई, बेरोजगारी याविरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सिलिंडर गॅस कमी केला पण अजूनही 700 रुपये सिलिंडर आहे. मोदी गरिबांसाठी काम करणार नाहीत. आता गरिबांचा पैसा जात आहे, तो थांबवण्यासाठी इंडिया आघाडी जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. त्यानुसार काम करणार आहे, असेही ते म्हणाले.

' मोदी सरकार स्वायत्त संस्थांचा सत्यानाश करत आहेत. मणिपूर जळत होतं, तेव्हा विशेष अधिवेशन बोलावलं नाही. कोव्हिड, नोटाबंदी झाली, तेव्हाही अधिवेशन बोलावलं नाही. आता का अधिवेशन बोलावलं, हे माहीत नाही. हळूहळू हुकूमशाही येत आहे. माध्यामांवरही निर्बंध आणले जात आहेत. पत्रकारांच्या लिखाणावर निर्बंध आणले जात आहेत, असे ते पुढे म्हणाले.

INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या समन्वय समितीची घोषणा; शरद पवार, संजय राऊतांसह १४ नेत्यांवर मोठी जबाबदारी

'पुढील बैठक कुठे आणि कधी घेणार हे आम्ही ठरवू आणि सांगू. आम्हाला ते घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आम्ही घाबरणार नाही. पुढेही सार्वजनिक बैठका होतील, त्या कुठे होतील, त्याबाबत माहिती देऊ. मोदी खोटं बोलतात, पण लोकांना ते खरं वाटतं. मराठीत एक म्हण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, असं ते करतात, अशी टीका खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply