Malhar Certificate: 'मल्हार' सर्टिफिकेशनला जेजुरीकरांचा विरोध, थेट आंदोलनाचा दिला इशारा

Jejuri : साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरच्या मल्हारीचं नाव आता मल्हार झटका मटण असं दिले जात असल्यामुळे राज्यातील सर्व मल्हार भक्तांमध्ये तीव्र संताप आहे. देवाच्या नावाने मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याला आता जेजुरीकरांनी देखील विरोध केला आहे.

'जेजुरीच्या खंडेरायाला 'जय मल्हार' असे भावभक्तीने म्हटले जाते आणि तोच जयघोष आहे. मात्र या नावाने मांस , मटण किंवा मद्य विक्रीच्या योजनेला 'मल्हार सर्टिफिकेशन' नाव देणे किंवा त्या नावाचे समर्थन, स्वागत करणे पूर्णपणे अयोग्य आहे.', असे मत माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.

Pune : लोणी काळभोर भागात अफुची लागवड, पोलिसांचा छापा; महिला गजाआड

तसंच,'मल्हार नाव मटण, मास योजनेसाठी वापरण्यास आमचा तीव्र विरोध आहे. शासनाने हे नाव बदलले नाही तर वेळ आल्यास जेजुरीकरांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करू.', असा इशारा देखील वीणा सोनवणे यांनी दिला आहे. भाविकांच्या भावना दुखावण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे याबाबत लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

देवताच्या नावाने मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या मंत्री नितेश राणे यांच्या घोषणेला जेजुरी मार्तंड देवस्थानाच्या काही सदस्यांनी विरोध केला आहे. तर देवस्थानाच्या ५ सदस्यांनी राणेंच्या निर्णयाला पाठिंबादिला. खंडोबाला पुरणपोळीचा नैवेद्य असतो, आमचा देव शाकाहारी असून ‘मल्हार’ नावाने मटण दुकानांना सर्टिफिकेट देऊ नये, अशी विनंती देवस्थानच्या सदस्यांनी केली आहे. सध्या राज्यामध्ये मल्हार सर्टिफिकेटचा वाद चांगलाच पेटला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply