Maldives China Military Deal : मालदीवचा चीनसोबत करार, भारतीय सैनिकांची एक्झिट

Maldives China Military Deal : मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधातील दुरावा अजूनही कायम आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारताना दिसत नाहीत. चीनसोबत झालेल्या लष्करी करारांदरम्यान मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 10 मे नंतर कोणत्याही भारतीय सैनिकाला  मालदीवमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.

भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारे मालदीवमध्ये राहू शकत नाही. भारतीय सैन्य मालदीव सोडत नाहीये. भारतीय सैनिक साधे कपडे घालून मालदीवमध्ये वावरत आहेत.

PM Modi Congratulates Shehbaz Sharif : पंतप्रधान मोदींककडून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं अभिनंदन, ट्वीट करत म्हणाले...

मालदीव आणि चीनमध्ये लष्करी करार

सध्या 88 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत. ते प्रामुख्याने दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान चालवतात. याद्वारे त्यांनी शेकडो वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिमा पूर्ण केल्या आहेत. या लष्करी कर्मचाऱ्यांना 10 मे पूर्वी मालदीव सोडण्यासाठी सांगण्यात आलं आहे. 10 मे नंतर कोणत्याही भारतीय सैनिकाला मालदीवमध्ये राहण्यास परवानगी दिली जाणार नाही, असं मुइझ्झू यांनी सांगितलं आहे.

मालदीव आणि चीन यांच्यातील जवळीक वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये दोन लष्करी करार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चीनने मालदीवला कोणत्याही अटीशिवाय लष्करी मदत देण्याचं आश्वासन दिले आहे. मात्र, ही लष्करी मदत कोणत्या प्रकारची असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक घट्ट झाल्याची माहिती मिळत आहे.

भारत आणि मालदीवमध्ये तणाव

भारत आणि मालदीवमध्ये  सध्या तणावाचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींच्या दौऱ्यातील काही छायाचित्रांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद अधिक वाढले आहेत.

मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरून परतल्यानंतर मुइझूंनी मोठे निर्णय घेतले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply