Malad Fire : आगीचं सत्र सुरुच! मुंबईतील मालाडमध्ये भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक

Malad Fire : मुंबईत आगीचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी गोरेगावमध्ये आग लागली होती. त्यानंतर आज सोमवारी मुंबईच्या मालाडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाड त्रिवेणीनगर झोपडपट्टीला मोठी आग लागल्याची दुर्घटना समोर आली आहे. झोपडपट्टीतील घरांना आग लागल्यानंतर परिसरातच एकच खळबळ उडाली. त्यानंतर परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला ही माहिती कळवली. आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

Rajya Sabha Election Date : महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, तारीख जाहीर

मालडमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालाड पूर्वेकडील कुरार परिसरातील त्रिवेणीनगर या झोपडपट्टीला मोठी आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई अग्निशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने आगीच्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply