Mahayuti Politics : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३१ जागा लढवणार, सूत्रांची माहिती

Mahayuti Politics : भाजपने राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला नसल्याने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता समोर येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे. यामध्ये भाजप ३१ जागा, शिवसेना शिंदे गट १३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४ लोकसभेच्या जागा मिळतील, अशी माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. लवकरच तिन्ही पक्ष आपल्या उमेदवारांचा यादी जाहीर करु शकतात.

Pune Crime News : कोयता गँगच्या म्होरक्याचा कोयत्यानेच खात्मा; 10 जणांवर गुन्हा दाखल

भाजपची २० उमेदवारी जाहीर

  • चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

  • रावेर - रक्षा खडसे

  • जालना- रावसाहेब दानवे

  • बीड - पंकज मुंडे

  • पुणे- मुरलीधर मोहोळ

  • सांगली - संजयकाका पाटील

  • माढा- रणजीत निंबाळकर

  • धुळे - सुभाष भामरे

  • उत्तर मुंबई- पियुष गोयल

  • उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा

  • नांदेड- प्रतापराव चिखलीकर

  • अहमदनगर- सुजय विखे पाटील

  • लातूर- सुधाकर श्रृंगारे

  • जळगाव- स्मिता वाघ

  • दिंडोरी- भारत पवार

  • भिवंडी- कपिल पाटील

  • वर्धा - रामदास तडस

  • नागपूर- नितीन गडकरी

  • अकोला- अनुप धोत्रे

  • नंदुरबार- डॉ. हिना गावित

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply