Mahayuti Cabinet Expansion : शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस तोडलं; मोठा निर्णय घेत आमदारानं दिला राजीनामा

Mahayuti Cabinet Expansion : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय. नागपूर येथे मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळालीय. तर काही आधीच्या मंत्र्यांना डच्चू मिळालाय. ज्या आमदारांची मंत्रिपदाची वर्णी लागलीय. त्यांना पक्षाकडून फोन गेले आहेत, त्यांना नागपूर येथे शपथविधीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलंय. याचदरम्यान शिंदे गट शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे. एकनाथ शिंदेंनी मंत्रिपदाचं प्रॉमिस पाळलं नाही, त्यामुळे तीनदा आमदारकी भुषवणाऱ्या नरेंद्र भोंडेकर यांनी मोठा निर्णय घेतला.

ज्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, ते नाराज झाले असल्याची चर्चा आहे. अशात शिवसेनेच्या आमदाराने थेट राजीनामा दिल्याची बातमी भंडारा येथून आलीय. महाराष्ट्रात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे, त्याचवेळी शिंदे सेनेला मोठा धक्का बसलाय. तीनदा आमदार म्हणून निवडून येणारे शिवसेनेचे नेते भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय.त्यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रिमंडळात कुठेही स्थान न मिळाल्याने अखेर त्यांनी हा राजनामा दिलाय. भोंडेकर मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज आहेत की काय अशा चर्चेला आता उधाण आले आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024 : उदय सामंत ते भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज नागपूरमध्ये होतोय. या शपथविधी सोहळ्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलीय. शिवसेनेचे जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आलीत. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार आहेत.
तर ज्यांना मंत्रिपदासाठी फोन आला नाही त्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर हेही मंत्रिपदासाठी इच्छुक होते. परंतु त्यांना फोन आला नसल्याने त्यांनी शिवसेना उपनेते व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय.

शपथ घेणारे शिवसेनेचे नेते
१) उदय सामंत
२) शंभुराजे देसाई
३) गुलाबराव पाटील
४) दादा भुसे
५) संजय राठोड
६) संजय शिरसाट
७) भरतशेठ गोगावले
८) प्रकाश अबिटकर
९) योगेश कदम, कोकण
१०) आशिष जैस्वाल
११) प्रताप सरनाईक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply