Maharshtra Politics : राजसाहेब पक्षहिताचा निर्णय घेतील, राज ठाकरेंच्या दिल्लीवारीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

Maharshtra Politics : लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे दिल्लीला का गेलेत? हे काही तासांतच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा आणि पक्षाच्या हिताचा असेल. बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत गेलेत तर आम्हाला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

Lok Sabha Election : २ जागांसाठी मनसेची दिल्ली वारी; महायुतीच्या बैठकीत राज ठाकरे सहभागी

राज ठाकरेंचा दिल्ली दौरा

संदीप देशपांडे म्हणाले की, आम्हाला राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू. कधी यश आलं तर कधी अपयश आलं, पण ते खचून गेले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल  झालाय, हे खरं आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर महायुतीमध्ये जाणार वैगरे अशा बातम्या तुम्ही चालवत आहात, असं देशपांडे यांनी  माध्यमांशी बोलताना म्हटलंय. आम्हाला कोणतीही अट घातलेली नाही, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. राज ठाकरे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा  आहे.

लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेही आता रिंगणात उतरणार आहे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार असल्याची माहिती मिळतेय. मनसेकडून लोकसभेसाठी २ जागांची मागणी केली गेली आहे. या जागांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्ली गाठली आहे. लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर झाल्यानंतर देशात आचार संहिता लागू झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply