Maharashtra Rain : पुण्यासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट; पुढील २-३ दिवस अवकाळीसह गारपीट अन् वादळी वाऱ्याचा अंदाज

Maharashtra Weather Update : एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह इतरही भागाला पावसाने झोडपून काढलं आहे. अशातच हवामान विभागाकडून पुण्यासह विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या शहरात पावसाची शक्यता शक्यता आहे. पुण्यातील वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याकडून शहरासह पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

तर दुपारच्या सुमारास शहरातील तापमानात मोठी वाढ होणार आहे. पुण्यातील तापमान ३८ अंश सेल्सियस इतका राहणार आहे. तर पुढील काही दिवसात शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

विदर्भात येलो अलर्ट

विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून नागपूरात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच हवामान खात्याने विदर्भात येलो अलर्ट जरी केला आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. त्यामुळे उन्हाने होरपळणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार. मात्र या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यापासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. या नुकसानाचे लवकरात लवकर पंचनामे तयार करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

येलो अलर्ट म्हणजे काय?

यलो अलर्ट ही हवामानाबाबत धोक्याची पहिली घंटा आहे. जेव्हा हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला तेव्हा ते तुम्हाला सतर्क राहण्यास सांगतात. अशा परिस्थितीत तुम्हाला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यलो अलर्ट जारी करण्याचा उद्देश लोकांना सतर्क करणे हा आहे. यानुसार, तुम्हाला काळजी घेणे महत्वाचे आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply