Maharashtra Weather Update : राज्यात आजही अवकाळीची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे ळागले आहे. पाऊन आणि गारपिटीचा राज्यातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. यादरम्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण भारतीय हवामान विभागाकडून आज पुन्हा राज्यातील काही भाहाना विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आळी आहे. यासोबतच, राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी 13 ते 14 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येथे गारपीटीची शक्यता

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply