Maharashtra Weather Upadte : पुण्याचा पारा ८.७ अंशांवर, राज्यातील 'या' भागांत थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

 

Maharashtra Weather Upadte : राज्यभरातील अनेक शहरांच्या किमान तापमानात घट झाली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात थंडी वाढली आहे. पुण्यात पारा ८.७ अंशावर गेला आहे. गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी राज्यातील सरासरी किमान तापमान ११ ते १२ अंशांवर खाली आल्याने अवघा महाराष्ट्र गारठला. पुणे शहरातील एनडीए भागाचे तापमान ८.७ अंश सेल्सिअस इतके सर्वांत निच्चांकी ठरले. त्या पाठोपाठ अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नागपूर, गोंदिया या ठिकाणचा पारा १० ते ११ अंशांवर खाली आला.

दरम्यान, आज म्हणजेच शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात फेंगल या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. त्यामुळे देशात दाट धुके वाढण्याची शक्यता आहे. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) भागातील किमान तापमान ८.७ अंशांवर खाली आल्याने गुरुवारी ते राज्यात निच्चांकी ठरले. अहिल्यानगरचाही पारा ९.८ अंशांवर खाली आल्याने नगर जिल्हा गारठला आहे.

गुरुवारी राज्याचे सरासरी किमान तापमान 11 ते 12 अंशांवर खाली आल्याने अवघ्या राज्याला हुडहुडी भरली. शुक्रवारी बंगालच्या उपसागरात फेंगल नावाचे चक्रीवादळ तयार होत असल्याने वातावरणात आणखी बदल होऊन दाट धुके अन् थंडीची तीव्र 1 डिसेंबरपर्यंत वाढणार आहे.

Sawantwadi : मालवण समुद्रात भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम

तसेच कोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीत थंडीची लाट उसळली असून कमाल व किमान तापमानात सतत चढ उतार जाणवत आहे. थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या दापोलीमध्ये अचानक कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांनी या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला जात आहे , तर काही लोकांनी उबदार कपडे बाहेर काढले आहेत. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दापोली देणे पसंत करत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांनी व्यायामावर भर दिला आहे.

जळगाव जिल्ह्याचे रात्रीचे तापमान घसरलं

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला असून किमान तापमान १३ अंशांवर गेले आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडीचा मागमूस नव्हता. मात्र दोन दिवसांपासून किमान तापमान घसरू लागले आहे. आठवड्यात थंडीची लाट आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जळगाव जिल्ह्याचे दिवसाचे तापमान ३० अंशांवर आहे, तर रात्रीचे तापमान ११ अंशांवर आले आहे. त्यामुळे रात्रीचा पारा कमालीचा कमी झाल्याने लहान बाळांना गरम कपड्यासह त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याचदरम्यान, भंडाऱ्यातील शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. गत काही दिवसांपासून धुके आणि ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पिकाची फूल गळती होत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांवर नेहमीच संकटाची टांगती तलवार आहे. वातावरणातील बदल सर्वात आधी तुरीच्या पिकावर जाणवतो. ढगाळ वातावरणामुळे पिकाचा फुलोरा गळत चालला असून, याचा मोठा फटका तुर उत्पादकांना बसणार आहे. त्यामुळे पीक पुन्हा हातून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply