Maharashtra Weather Report : राज्यात पुन्हा थंडीची लाट; पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

Maharashtra Weather Report : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली होती. जवळपास १० ते १२ दिवस थंडी गायब झाल्यावर आता पुन्हा एकदा थंडी जाणवू लागली आहे. तसेच पुढचे काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

दोन दिवसांआधी औरंगाबाद शहराचं तापमान ९.६ अंशापर्यंत होतं. तर पुण्यामध्ये ११.५ अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली होती. ८ ते १० दिवसांआधी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे थंडी कमी झाली होती. तसेच हवेत होत असलेल्या बदलामुळे विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी पाऊस पडला.

हा पाऊस जास्त प्रमाणात झाला असता तर शेतीचे यात मोठे नुकसान झाले असते. मात्र २ तीन ३ सरींमध्ये परतीचा पाऊस निघून गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य प्रदेश, मराठवाडा या ठिकाणी तापमानाचा पारा जास्त प्रमाणात खाली सरकू शकतो, अशी शक्याता वर्तवण्यात आली आहे.

IMD कडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेनुसार, उत्तराखंडमध्ये आज आणि उद्या पाऊस येण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या ठिकाणी तापमान चिंतेची बाब ठरू शकते. कारण येथील तापमान सरासरीपेक्षा खाली सरकण्याची चिन्हे दिसत अससल्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply